नानक नाम जहाज है.
नानक नाम जहाज है..... भारत ही साक्षात्कारी संतांची खाण आहे. राजसत्तेच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या मनातील आक्रोशाला अनेकदा या साक्षात्कारी संतांनी आवाज दिलाय. इतकेच नव्हे तर प्रस्थापित धर्मसत्तेच्या विरोधातील लढाईत, समतेच्या, न्यायाच्या लढ्यात अनेक अध्यात्मिक चळवळी उभ्या राहिल्या. याच अध्यात्मिक चळवळी समाजात स्थिर झाल्यावर कालांतराने विषमतावादी, रूढीवादी व्यवस्था त्यांना स्वीकारल्याचा देखावा निर्माण करते आणि गिळंकृत करू पाहते. भारतात उभ्या राहिलेल्या अनेक समतावादी प्रवाहांतील एक महत्वाची धारा म्हणजे गुरु नानकांनी सुरु केलेला हा शीख धर्म . काल संध्याकाळी (३ जून रोजी) सहा वाजता मैत्री सद्भावना ग्रुपची अभ्यास चर्चा बैठक सीमा मालानी यांच्या घरी पार पडली. या मिटिंग मध्ये निशा शिऊरकर , शिवाजी गायकवाड , आर्किटेक्ट अमोल सांगळे , विनोद भोईर , डॉ इरफान अली , नम्रता पवार व मी डॉ अमित शिंदे उपस्थित होतो. काल शीख गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिवस असल्याने शीख धर्म , गुरू नानक , शिखांचे योगदान व गुरू अर्जुन देव यांचे हौतात्...