पोस्ट्स

Jijabai लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वराज्य जननी जिजाऊ आणि थोर सुधारक गोपाळ गणेश आगरकर

इमेज
    गो. ग. आगरकर आणि स्वराज्यसंकल्पिका जिजाऊ स्मरण   "मी कधीही वटसावित्रीची पूजा करत नाही." इतकेच साधे विधान सोशल मीडियावर करणाऱ्या एका मोठ्या पदावरील स्त्रीला परवा अश्लील भाषेत ट्रॉल केले गेले.  "नो बिंदी, नो बिझनेस." अशी कॅम्पेन मध्यंतरी चालविण्यात आली.  पुरुषांसाठी मात्र "नो धोती, नो बिझनेस" अशी कुठलीही मोहीम राबविण्यात आली नाही.  एकूणच आजही परंपरा पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकण्यात येते.  सोशल मीडियाच्या उदयानंतर जुन्या प्रथा आणि रूढी यांना हळूहळू, क्रमाक्रमाने ग्लोरिफाय करण्याची मोहीम जोरात सुरु झाली.  अशा वातावरणात पतिनिधनानंतर सती न जाता हिंदवी स्वराज्याची ब्लुप्रिंट बनविणाऱ्या राजमाता जिजाबाई आणि स्रियांना रूढींच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन एकाच दिवशी यावा हा विलक्षण योगायोग आहे.    काल दिनांक १७ जून २०२२ रोजी मैत्री सद्भावना ग्रुपची पाक्षिक बैठक आर्किटेक्ट अमोल सांगळे यांच्या घरी पार पडली. त्यात शिवाजी गायकवाड, विनोद भोईर...