पोस्ट्स

संत साहित्य आणि समाज

इमेज
 संत साहित्य आणि समाज  दिनांक १५ जुलै २०२२ रोजी 'कडेपठार बंगला' सायखिंडी फाटा प्रा. प्रवीण मेहेत्रे यांच्या निवास्थानी मैत्री सद्भावना ग्रुपची बैठक पार पडली. या   बैठकीस डॉ अमित शिंदे, प्रवीण मेहेत्रे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, सीमा मालाणी, मीरा मेहेत्रे, वीणा मेहेत्रे, रेणुका मेहेत्रे, संदीप मेहेत्रे, अंतून घोडके आणि प्रा. सुशांत सातपुते उपस्थित होते.  नुकतीच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा होऊन गेलेली असल्याने त्या दिवशी संत साहित्यावर चर्चा करण्यात आली.  सर्वप्रथम सीमा मालाणी यांनी लोकसत्ता मधील स्त्री संतांविषयीच्या 'न व्हावे उदास' या लेखाचे वाचन केले.  तेराव्या शतकात वारकरी संप्रदायात स्त्रियांनी बरोबरीचे स्थान मिळवून अभंगरचना करून अनेकदा क्रांतिकारी भूमिका घेतली होती. 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हे ब्रीदवाक्य असलेल्या वारकरी संप्रदायात विविध जाती, धर्मातील स्त्री पुरुष संत होऊन गेले. 'स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास.' या ओळी अक्षरशः जगणाऱ्या अनेक स्त्री संतांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुष संतांच्या घरातील स्त्रिया वारकरी संप्रदायात ओढल्या गेल्या, त्या

महर्षी

इमेज
      जाती अंताचे अग्रदूत महर्षी  विठ्ठल रामजी शिंदे    "कोण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे? मी हे नाव पहिल्याच ऐकतोय." तरुण मित्र म्हणाला. अस्पृश्यता  निवारण आणि जाती अंतासाठी इतके प्रचंड काम केलेल्या व्यक्तीची माहिती तरुण पिढीला नसावी ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणूनच गेल्या शुक्रवारी एक जुलै रोजी निशा शिवूरकर आणि शिवाजी गायकवाड यांच्या मैत्री या निवास्थानी झालेल्या बैठकीला हाच विषय घ्यावा असे ठरले.  या बैठकीला अनिल शिंदे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, विनोद भोईर, प्रा. प्रवीण मेहेत्रे, विना मेहेत्रे आणि डॉ अमित शिंदे उपस्थित होते. डॉ अमित शिंदे यांनी  'विसाव्या शतकातील मराठी गद्य' या साहित्य अकादमीकडून प्रकाशित आणि भास्कर लक्ष्मण भोळे संपादित पुस्तकातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लिखित 'तत्वज्ञान आणि समाजशास्त्र' हा निबंध तसेच मुंबई विद्यापीठाच्या बी ए द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातील पुस्तकातील विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेल्या "समाजसुधारणा यशस्वी का होत नाहीत?' या लेखाचे वाचन करून त्यातील निवडक भाग अधोरेखित केला होता. विठ्ठल रामजी शिंदे हे समाजसुधारक ह

स्वराज्य जननी जिजाऊ आणि थोर सुधारक गोपाळ गणेश आगरकर

इमेज
    गो. ग. आगरकर आणि स्वराज्यसंकल्पिका जिजाऊ स्मरण   "मी कधीही वटसावित्रीची पूजा करत नाही." इतकेच साधे विधान सोशल मीडियावर करणाऱ्या एका मोठ्या पदावरील स्त्रीला परवा अश्लील भाषेत ट्रॉल केले गेले.  "नो बिंदी, नो बिझनेस." अशी कॅम्पेन मध्यंतरी चालविण्यात आली.  पुरुषांसाठी मात्र "नो धोती, नो बिझनेस" अशी कुठलीही मोहीम राबविण्यात आली नाही.  एकूणच आजही परंपरा पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकण्यात येते.  सोशल मीडियाच्या उदयानंतर जुन्या प्रथा आणि रूढी यांना हळूहळू, क्रमाक्रमाने ग्लोरिफाय करण्याची मोहीम जोरात सुरु झाली.  अशा वातावरणात पतिनिधनानंतर सती न जाता हिंदवी स्वराज्याची ब्लुप्रिंट बनविणाऱ्या राजमाता जिजाबाई आणि स्रियांना रूढींच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन एकाच दिवशी यावा हा विलक्षण योगायोग आहे.    काल दिनांक १७ जून २०२२ रोजी मैत्री सद्भावना ग्रुपची पाक्षिक बैठक आर्किटेक्ट अमोल सांगळे यांच्या घरी पार पडली. त्यात शिवाजी गायकवाड, विनोद भोईर, माया भोईर, अमोल स

नानक नाम जहाज है.

इमेज
नानक नाम जहाज है.....  भारत ही साक्षात्कारी संतांची खाण आहे. राजसत्तेच्या विरोधात सर्वसामान्य  लोकांच्या मनातील आक्रोशाला अनेकदा या साक्षात्कारी संतांनी आवाज  दिलाय. इतकेच नव्हे तर प्रस्थापित धर्मसत्तेच्या विरोधातील लढाईत,  समतेच्या, न्यायाच्या लढ्यात अनेक अध्यात्मिक चळवळी उभ्या राहिल्या. याच अध्यात्मिक चळवळी समाजात स्थिर झाल्यावर कालांतराने विषमतावादी, रूढीवादी व्यवस्था त्यांना स्वीकारल्याचा देखावा निर्माण करते आणि गिळंकृत  करू पाहते.  भारतात उभ्या राहिलेल्या अनेक समतावादी प्रवाहांतील एक महत्वाची  धारा म्हणजे गुरु नानकांनी सुरु केलेला हा शीख धर्म .  काल संध्याकाळी (३ जून रोजी) सहा वाजता मैत्री सद्भावना ग्रुपची अभ्यास चर्चा बैठक सीमा मालानी यांच्या  घरी पार पडली. या मिटिंग मध्ये निशा शिऊरकर , शिवाजी गायकवाड , आर्किटेक्ट अमोल सांगळे , विनोद भोईर ,  डॉ इरफान अली , नम्रता पवार व मी डॉ अमित शिंदे उपस्थित होतो.  काल शीख गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिवस असल्याने शीख धर्म , गुरू नानक , शिखांचे योगदान  व गुरू अर्जुन देव यांचे हौतात्म्य या विषयावर चर्चा झाली.  सीमा मालानी यांनी साहित्य अकाद